सांगली येथील निवृत्त उपशिक्षणाधिकारी वसंत चौगुले यांचे निधन
तुंग (जिल्हा सांगली) – सांगली येथील निवृत्त उपशिक्षणाधिकारी वसंत चौगुले (वय ७२ वर्षे) यांचे नुकतेच निधन झाले. निवृत्त शिक्षिका कांचन चौगुले यांचे ते पती, तर मिरज महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विनय चौगुले यांचे ते वडील होत. त्यांनी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तसेच पालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून काम केले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, असा परिवार आहे. वसंत चौगुले हे साप्ताहिक सनातन प्रभातचे नियमित वाचक होते, तसेच सनातन संस्थेचे अर्पणदातेही होते.