पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ट्वीट करणार्या वैमानिकाला ‘गोएअर’ने कामावरून काढले !
नवी देहली – ‘गोएअर’ या विमान वाहतूक करणार्या आस्थापनाच्या मिकी मलिक या वैमानिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याने त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे, अशी माहिती या आस्थापनाने दिली आहे.
Captain Miki Malik had reportedly posted a tweet on Thursday where he had make objectionable comments on PM Modi.@PoulomiMSaha https://t.co/gomMVC19UR
— IndiaToday (@IndiaToday) January 10, 2021
‘पंतप्रधान मूर्ख आहेत. तुम्ही मलाही मूर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही; कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मूर्ख आहेत’, असे मलिक यांनी ट्वीट केले होते. या ट्वीटवरून वाद झाल्याने मलिक यांनी ते डिलीट करत क्षमायाचनाही केली होती. तसेच ट्विटर खाते लॉकही केले होते. ‘ट्वीटमधून व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक होती. त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गोएअरचा कोणताही संबंध नाही’, अशी क्षमा त्यांनी मागितली होती.