१ लाख ८५ सहस्र रुपयांची बनावट कृषी औषधे जप्त
शेतकर्यांची फसवणूक करणार्यांना कठोर शासन व्हायला हवे !
वणी (यवतमाळ) – येथील विवेकानंद कॉम्प्लेक्समधील बोढे कृषी केंद्रातून १ लाख ८५ सहस्र रुपयांची बनावट कृषी औषधे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी पोलिसांच्या साहाय्याने जप्त केली. या वेळी कृषी केंद्र चालक सुनील बोढे यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.