राज्यातील अवयवदानात पुणे अव्वल

अवयवदान करणे, अध्यात्मशास्त्रदृष्ट्या चुकीचे आहे. समाजाला शास्त्र माहीत नसल्यामुळे अशा चुकीच्या कृती केल्या जातात.

पुणे – राज्यात अवयवदानाची चळवळ रुजवण्यात पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे योगदान मोठे आहे. वर्ष २०२० मधील महामारीच्या वर्षांतही राज्यातील सर्वाधिक अवयवदान यशस्वी करण्यात समितीला यश आले आहे. हे अवयवदान गतवर्षीच्या तुलनेत अल्प असले, तरी राज्यात सर्वाधिक आहे, असे समितीच्या आरती गोखले यांनी सांगितले.

वर्ष २०१९ मध्ये ७८ रुग्णांच्या नातेवाइकांनी अवयवदान करण्याची सिद्धता दर्शवली होती. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात ४१ मेंदूमृत रुग्णांचे अवयव गरजू रुग्णांसाठी उपलब्ध झाले. (व्यक्ती मृत झाल्यानंतर तिच्या लिंगदेहाला स्वत:च्या देहाची आसक्ती जावी आणि त्याला लवकरात लवकर सद्गती मिळावी, म्हणूनच हिंदु धर्मात अग्नीसंस्कार अन् श्राद्धविधी करण्याची पद्धत आहे. देहदान केल्यास व्यक्तीचा लिंगदेह त्या त्या अवयवाभोवती घुटमळत राहू शकतो. – संपादक )