शासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे भाजी मंडईच्या कामाला विलंब – कंत्राटदार
कणकवली – नगरपंचायतीमध्ये होणार्या विरोधामुळेच भाजी मंडईच्या उभारणीच्या कामाला विलंब होत आहे. कणकवली शहरातील अनेक भूमींचे आरक्षण निधीअभावी नगरपंचायतीला विकसित करता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे प्रतिपादन ग्लोबल असोसिएटने केले आहे. कणकवली नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सभेत भाजी मंडईप्रश्नी ग्लोबल असोसिएटने फसवणूक केली असल्याचा आरोप नगराध्यक्षांनी केला होता. हा आरोप ग्लोबल असोसिएटने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे फेटाळले आहेत.