पावसामुळे पुण्याच्या प्रदूषणात घट !
पुणे – शहरात हवेतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ७ जानेवारी या दिवशी १२१ प्रतिघनमीटर इतके होते; मात्र ८ जानेवारीला झालेल्या पावसाने त्यात निम्म्याने घट होऊन ते ५३ प्रतिघनमीटर इतके नोंदवले गेले. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीत नोंदवला जात होता; मात्र पावसामुळे तो आता समाधानकारक श्रेणीत पोचला आहे. सफर या संकेतस्थळाच्या माध्यमातून देहली, मुंबई आणि कर्णावती (अहमदाबाद) या ३ शहरांच्या तुलनेत पुणे शहराची हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.