प्रथमोपचार आणि पुष्पौषधी
पुष्पौषधी ही एक वेगळी ‘पॅथी’ (flower Remedy) आहे. त्यानुसार पुढे औषध दिले आहे. बरेच आधुनिक वैद्य या पॅथीचा उपयोग करतात.
रेस्क्यू रेमिडी (Rescue Remedy)
‘गंभीर स्वरूपाचे अपघात, भाजणे, जळणे, ‘इलेक्ट्रिक शॉक’, तसेच विषप्रयोग इत्यादी कारणांमुळे जिवाला धोका निर्माण होऊन वैद्यकीय आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असेल, त्या वेळी या सर्व प्रकारांच्या आजारांवर हे औषध उपयुक्त आहे.
१. कितीही खोलवर जखम असेल आणि त्यामधून रक्तस्राव होत असेल, तर या औषधाने रक्तस्राव लगेचच नियंत्रणामध्ये येतो आणि जखमेवर ‘बँडेज’ करण्याची आवश्यकता भासत नाही.
२. रुग्ण बेशुद्ध होऊन हातपाय थंड पडले असतील, श्वासोछ्वास मंद झाला असेल आणि रुग्णाची नाडी लागत नसेल, तर हे औषध दिले असता काही मिनिटांतच ‘काहीच घडले नाही’, अशा पद्धतीने रुग्ण उठून चालू लागतो.
३. विषप्रयोग झाला असतांना किंवा विषारी प्राण्यांनी दंश केला असता हे औषध दिल्यास काही वेळातच विषाचा परिणाम नष्ट होण्यास साहाय्य होते.
४. भाजणे, पोळणे यांवर हे औषध दिले असता वेदना त्वरित अल्प होतात आणि भाजण्याचे गंभीर परिणामही होत नाहीत.
५. कोणत्याही प्रकारच्या असह्य वेदना त्वरित अल्प होतात.
कितीही गंभीर स्थिती असली, तरी या औषधाची केवळ एक मात्राच पुरेशी होते. दुसरी मात्रा देण्याची आवश्यकताच भासत नाही. हे केवळ प्रथमोपचार म्हणून उपयुक्त नसून या औषधामुळे रुग्ण पूर्णपणे बरा होतो. शस्त्रक्रिया करण्याच्या काही वेळ आधी या औषधाची एक मात्रा दिली असता शस्त्रक्रियेनंतर अतिशय अल्प प्रमाणात रक्तस्राव होतो आणि जखम लवकर भरून रुग्ण लवकर घरी जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने हे औषध आपल्या प्रथमोपचार पेटीमध्ये ठेवणे आवश्यक आहे.’
– आधुनिक वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.२.२०२०)