१६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ होणार
नवी देहली – केंद्र सरकारने ‘कोव्हिशिल्ड’ आणि स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ या २ कोरोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन स्थितीत मर्यादित वापर करण्यास मान्यता दिल्यानंतर आता सरकारने देशात येत्या १६ जानेवारीपासून याच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या लसीकरणात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि कोरोना योद्धे यांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरिकांना लस देणाची योजना आहे.