डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद
ट्रम्प समर्थकांनी संसदेमध्ये केलेल्या हिंसाचाराचा परिणाम !
वॉशिंग्टन – अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेमध्ये घुसून केलेल्या हिंसचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हिंसा आणखी भडकावण्याची शक्यता असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे’, असे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचे काही ट्वीट्स डिलीट केले होते आणि त्यांचे खाते काही काळासाठी बंद केले होते; मात्र आता ते कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी मागच्या काही कालावधीत केलेल्या ट्वीटसची समीक्षा केल्यानंतर ट्विटरने हा निर्णय घेतला.