कोरोनाचा प्रभाव उणावूनही शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२ टक्के !

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार उणावला असला, तरी कोरोनाविषयीची भीती अल्प होत चालली आहे. परिणामी जिल्ह्यातील शाळा मोठ्या प्रमाणात चालू झाल्या आहेत. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४२.४२ टक्के एवढीच आहे. ४२ सहस्र ४२४ विद्यार्थी संख्येपैकी १८ सहस्र विद्यार्थी शाळेत उपस्थित रहात आहेत. २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. आरंभी याला पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. नंतरच्या काळात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली असली, तरी आता कोरोनाचा प्रभाव बर्‍याच अंशी उणावूनही विद्यार्थी ‘ऑनलाईन’ शिक्षण घेण्यासच प्राधान्य देत आहेत.

जिल्ह्यातील २४७ शाळांपैकी सध्या २१६ शाळा चालू आहेत. हे प्रमाण ८७.४४ टक्के इतके आहे, तर उर्वरित शाळांमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवले जात आहे.