बैठकीमध्ये शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप
नवी देहली – कृषी कायदे रहित करण्यासाठी गेले दीड मास आंदोलन करत असलेले शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. यावर आता १५ जानेवारीला चर्चा होणार आहे.
(सौजन्य : Hindustan Times)
बैठकीत सरकारने ‘शेतकर्यांना ‘नवे कायदे हे संपूर्ण देशासाठी लागू असून केवळ पंजाब आणि हरियाणा राज्यांपुरते मर्यादित नाहीत’, असे सांगितले, तर शेतकरी नेत्यांनी ‘राज्यांना त्यांचा कायदा आणू द्यावा’, अशी मागणी केली.