‘रामराज्य’ अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी श्रीरामभक्तांकडून ट्विटरवर ट्रेंडद्वारे संकल्प

#RamMandirForRamRajya हा ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ ४ थ्या स्थानी !

मुंबई – प्रभु श्रीरामाच्या कृपेने वर्ष २०१९ मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामंमदिर बांधण्याची वाट मोकळी झाली आणि तेथे मंदिराच्या उभारणीसाठी भूमीपूजनही करण्यात आले; मात्र हिंदूंनी श्रीराममंदिर उभारण्यापर्यंत सीमित न रहाता प्रभु श्रीरामाला अपेक्षित असे ‘रामराज्य’ आणण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने धर्माभिमानी हिंदूंनी ट्विटरवर ८ जानेवारी या दिवशी #RamMandirForRamRajya नावाने ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ केला होता. यावर २० सहस्रांहून अधिक जणांना ट्वीट करत याला अनुमोदन दिले. हा ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमाकांवर होता.

श्रीरामभक्तांनी ट्वीट करतांना आदर्श हिंदु राष्ट्र कसे असेल, त्याच्या स्थापनेची दिशा काय असणार, प्रभु श्रीरामानुसार आदर्श राज्यव्यवस्था आदी विषयांवर ट्वीट्स केले.