मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणार्याला अटक
मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मनोज देधिया याला पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. न्यायालयाने देधिया याला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याने अनेकांना धमक्या दिल्याचे अन्वेषणात आढळून आले. यापूर्वी कर्नाटक येथील एका पोलीस अधिकार्यालाही देधिया याने धमकी दिली होती.