फोंडा पोलीस ठाण्यात धर्मांधाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार नोंद
गोव्यातील मुलीबाळीही आता धर्मांधांच्या वासनांधतेची शिकार !
फोंडा, ८ जानेवारी (वार्ता.) – पिळये, धारबांदोडा येथील एक अल्पवयीन मुलगी गायब झाल्यासंबंधीची तक्रार ७ जानेवारी या दिवशी फोंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही तक्रार सदर मुलीच्या आईने दिली असून त्यामध्ये उसगाव येथे रहाणार्या अब्दुल सय्यद (२० वर्षे) याने तिचे अपहरण केले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीनुसार फोंडा पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अहवालाची नोंद करण्यात आली असून भारतीय दंड संहितेचे कलम ३६३ आणि गोवा बाल हक्क कायदा २००३ चे ८ वे कलम यांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी आणि गायब झालेली मुलगी यांचा पोलीस शोध घेत असून अजून त्याविषयी काही माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे, असे फोंडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वैभव शिरोडकर यांनी सांगितले.