दत्त जयंतीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड येथे विविध उपक्रमांचे आयोजन
चिंचवड – दत्त जयंतीनिमित्त १० डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत पिंपरी, चिंचवड आणि नाशिक रस्ता विभागात प्रबोधन मोहीम घेण्यात आली. या मोहिमेमध्ये दैनिक सनातन प्रभातचे वाचक, धर्मप्रेमी, हितचिंतक, नातेवाईक आणि जिज्ञासू असे एकूण १३६ जण सहभागी झाले होते. सत्संग, ऑनलाईन प्रवचने, शाळेतील व्याख्याने, सामूहिक नामजप असे विविध उपक्रम या वेळी घेण्यात आले.
चैतन्य इंटरनॅशनल शाळेत ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रवचन अन् सामूहिक नामजप घेण्यात आला. सत्संग आणि ऑनलाईन प्रवचनांमध्ये जिज्ञासूंनी सत्संगातून नवीन माहिती मिळाल्याचे सांगितले, तसेच आजूबाजूच्या लोकांनीही प्रवचनाचा लाभ घेतला. सामूहिक नामजप करतांना अनेकांचा भाव दाटून आला, तसेच मंदिरात बसून नामजप करत असल्याची अनुभूती आली. दत्तजयंतीनिमित्त एकूण ६३ प्रवचने झाली त्याचा ५९५ जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला. ग्रंथवितरणासह चैतन्यवाहिनीच्या माध्यमातूनही जिज्ञासू सहभागी झाले होते.