पुणे येथे हॉटेलच्या वेटरकडून ग्राहकाची आर्थिक फसवणूक
लुबाडलेली रक्कम अशांकडून वसूल करून घ्यायला हवी !
पुणे – पिंपरी-चिंचवडच्या लांडेवाडी चौकातील मधुबन बार अँड रेस्टराँमध्ये जेवण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्यातून ९४ सहस्र ५०० रुपये काढून आर्थिक फसवणूक करण्यात आली. डिसेंबर २०२० मध्ये ही घटना घडली असून उमेश देविदास अन्वेकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलच्या वाढपीला (वेटरला) अटक केली आहे.
जेवणानंतर अन्वेकर यांनी देयक भरण्यासाठी वाढपीला डेबिट कार्ड दिले होते. थोड्या दिवसांनी त्यांच्यातील तीन जणांच्या डेबिट कार्डमधून पैशांचा व्यवहार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिन्ही कार्डमधून अनुक्रमे ५० सहस्र, २५ सहस्र आणि १९ सहस्र ५०० रुपयांचा व्यवहार झाला होता.