उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर बिनविरोध निवड
पणजी, ७ जानेवारी (वार्ता.) – उत्तर गोवा जिल्हा पंचायत आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत यांच्या अध्यक्ष अन् उपाध्यक्ष पदांवर ७ जानेवारी या दिवशी बिनविरोध निवड झाली. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी कार्तिक कुडणेकर, तर उपाध्यक्षपदी दिक्षा खानोलकर यांची, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी सुवर्णा तेंडुलकर यांची, तर उपाध्यक्षपदी कुशाली वेळीप यांची निवड झाली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी अन्य कुणीही अर्ज न केल्याने ही निवड बिनविरोध झाली. ८ जानेवारी या दिवशी याविषयी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.