लव्ह जिहादविरोधी कायदा रहित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयात लव्ह जिहादविरोधी प्रविष्ट करण्यात आलेली याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. सरकारने म्हटले होते की, याविषयी सर्वोच्च न्यायालयातही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे आणि त्यावर सुनावणी चालू आहे; मात्र उच्च न्यायालयाने हे न स्वीकारता सुनावणी चालू ठेवण्याचा आदेश दिला.