महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगर येथील बसगाड्यांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक चिकटवले नामांतर न झाल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी
नगर – येथील तारकपूर बसस्थानकावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ६ जानेवारी या दिवशी संभाजीनगर येथे जाणार्या एसटी बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ नावाचे फलक चिकटवले. औरंगाबाद नामांतराच्या संदर्भात ठोस भूमिका घेण्यात येत नाही. त्यामुळे मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
‘नामांतराच्या संदर्भात कोणताही निर्णय होत नसल्याने बसगाड्यांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक चिकटवण्यात आले. याची नोंद घेऊन लवकरात लवकर नामांतर व्हावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल’, अशी चेतावणी देण्यात आली.