हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी धर्मप्रेमींनी प्रयत्न करावेत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
देहली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ऑनलाईन ‘हिंदु राष्ट्र विचार आणि कार्य प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन
नवी देहली – राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने सध्या आपत्काळ चालू आहे. वाढत्या नैसर्गिक आपत्ती, देशद्रोही आणि धर्मद्रोही यांचे वाढते बळ, राजकीय अस्थिरता, तसेच समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात वाढत असलेल्या अडचणी ही सर्व आपत्काळाची भौतिक लक्षणे आहेत. या भीषण काळानंतर हिंदु राष्ट्राची स्थापना निश्चित होणारच आहे. असे असले तरी हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी धर्मप्रेमींनी प्रयत्न करावेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील धर्मप्रेमींसाठी ऑनलाईन ‘हिंदु राष्ट्र विचार आणि कार्य प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते धर्मप्रेमींना मार्गदर्शन करत होते. या कार्यशाळेचा अनेक धर्मप्रेमींनी लाभ घेतला.
या वेळी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि त्यासाठी कार्य कसे करावे ?’, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये कसे योगदान द्यायचे’, या विषयावर समितीचे हरियाणा समन्वयक श्री. कार्तिक साळुंके यांनी माहिती सांगितली.