मिरज-पुणे रेल्वेमार्गाची रेल्वे प्रबंधक रेणु शर्मा यांच्याकडून पहाणी !
मिरज – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या रेल्वे प्रबंधक रेणु शर्मा यांनी ५ जानेवारी या दिवशी कोल्हापूर-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाची पहाणी केली. पॅसेंजर गाड्या चालू करण्याची रेल्वे प्रशासनाची सिद्धता असून महाराष्ट्र शासनाने अनुमती दिल्यास त्या चालू करू, असे त्यांनी या वेळी सांगितले. मिरज-पुणे रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणासह दुहेरीकरण करण्यात येत आहे. यातील मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या कामाच्या पहाणीसाठी २२ जानेवारी या दिवशी मध्य रेल्वेचे महाप्रबंधन संजीव मित्तल येणार आहेत. त्याची
पूर्वसिद्धता म्हणून शर्मा यांनी विविध कामांची पहाणी केली.