ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर यानिमित्ताने फटाक्यांसंबंधी सूचना प्रसिद्ध करण्याविषयी धर्माभिमानी अधिववक्त्यांचे गृहमंत्रालय अन् बंगालचे मुख्यमंत्री यांना पत्र
ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर यानिमित्ताने फटाक्यांसंबंधी सूचना प्रसिद्ध करण्याविषयी हुगळी (बंगाल) येथील धर्माभिमानी अधिवक्ता गोराचंद मल्लिक यांचे गृहमंत्रालय अन् बंगालचे मुख्यमंत्री यांना पत्र
कोलकाता – ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशी लावण्यात येणार्या फटाक्यांसंबंधी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्याविषयी हुगळी येथील धर्माभिमानी अधिवक्ता गोराचंद मल्लिक यांनी केंद्रीय गृहमंत्रालय अन् बंगालचे मुख्यमंत्री यांना ई-मेलच्या माध्यमातून निवेदन पाठवले. या निवेदनाची प्रत अधिवक्ता मल्लिक यांनी बंगालचे पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच हुगळीचे जिल्हाधिकारी यांनाही पाठवले होते.
या निवेदनात त्यांनी म्हटले होते की,
१. राष्ट्रीय हरित लवादाने ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या रात्री ११.५५ पासून १२.३० पर्यंत ग्रीन फटाके जेथील हवेची गुणवत्ता सामान्य किंवा चांगली आहे, अशा ठिकाणी वाजवू शकतो, असे निर्देश दिले; परंतु जेथे हवेची गुणवत्ता वाईट आहे, तेथे संपूर्ण बंदी राहील, असेही म्हटले आहे.
२. यापूर्वी दिवाळीच्या वेळी ९ ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत कोरोनाचे संकट लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचे फटाके फोडण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. ज्याप्रमाणे दिवाळीच्या वेळी कोरोना संकट लक्षात घेऊन फटाक्यांवर पूर्ण बंदी होती, त्याचप्रमाणे आताही कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे फटाक्यांवर संपूर्ण वर्षभर बंदी घालावी. याचसमवेत २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या दिवशी लोकांनी एकत्र न येण्याविषयी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करावी.