नेपाळ चीनऐवजी भारताकडून कोरोनाविरोधी लस घेण्याची शक्यता
काठमांडू (नेपाळ) – नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली हे १४ जानेवारी या दिवशी भारताच्या दौर्यावर येणार आहेत. त्या वेळी ते भारताकडून कोरोनाविरोधी लस विकत घेण्याविषयी करार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेपाळला भारताकडून १२ कोटी लसीचे डोस हवे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ड्रॅगनला झटका, करोना प्रतिबंधक लसीसाठी नेपाळ भारतावर अवलंबून https://t.co/1L1xsJrUcg via @LoksattaLive #Coronavirusvaccine #Nepal #China #India
— LoksattaLive (@LoksattaLive) January 6, 2021
चीननेदेखील नेपाळला लस पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र चीनपेक्षा भारतावर अधिक विश्वास व्यक्त करून नेपाळ चीनला धक्का देण्याच्या सिद्धतेत असल्याचे म्हटले जाते.