देवाने बलात्कार केल्याचे सांगणारा कार्यक्रम प्रक्षेपित केल्यावरून आर्यलंडच्या दूरचिवावाहिनीची क्षमायाचना
भारतात कधी दूरचित्रवाहिन्या अशा प्रकारे क्षमायाचना करतात का ?
लंडन (ब्रिटन) – आर्यलंडची सरकारी दूरचित्रवाहिनी ‘आरटीई’ने ३१ डिसेंबरच्या च्या सायंकाळी प्रसारित केलेल्या एका कार्यक्रमात देवाला बलात्कारी दाखवल्याच्या प्रकरणी करण्यात आलेल्या १ सहस्रांहून अधिक तक्रारींनंतर या वाहिनीने क्षमायाचना केली आहे. (भारतात हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान केला जातो, तेव्हा एकतरी हिंदु तक्रार करतो का ? – संपादक) या कार्यक्रमात एक चित्र दाखवण्यात आल होते. यात म्हटले होते, ‘देवाने पश्चिम आशियातून आलेल्या एका महिलेवर बलात्कार केला आणि त्यामुळे तिच्या मनाविरुद्ध ती गर्भवती झाली. त्यामुळे देवाला बलात्कारासाठी २ वर्षांची शिक्षा करण्यात आली आहे.’ आर्यलंडच्या कॅथॉलिक चर्चने या कायक्रमावर टीका करत ‘हा ख्रिस्त्यांचा अवमान आहे’, असे म्हटले होते.