नेपाळमध्ये हिंदु राष्ट्र आणि राजेशाही यांच्या पुनर्स्थापनेसाठीच्या आंदोलनाला धार !
सहस्रो लोकांकडून अनेक दिवसांपासून आंदोलन चालू !
विराटनगर (नेपाळ) – नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही स्थापन करून नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हिंदूंकडून आंदोलन चालू आहे. राजधानी काठमांडूसहित काही पर्वतीय भागात हे आंदोलन चालू आहे. आता राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीच्या नेतृत्वाखाली इटहरी ते विराटनगर या मार्गावर शेकडो युवक आणि महिला यांनी या मागणीसाठी निदर्शने केली, तसेच लोकशाहीच्या विरोधात घोषणाबाजी केली.
Nepal: Demonstration held in capital Kathmandu, demanding restoration of monarchy in the country. pic.twitter.com/TFjmKu9U9Z
— ANI (@ANI) December 5, 2020
काठमांडू, पोखरा, बुटवल, इटहरी, धरान, भैरहवा, विराटनगर, बीरगंज आदी भागांमध्ये ही आंदोलने चालू आहेत. नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राची पूर्वी स्थापना करणारे पृथ्वी नारायण शहा यांचे चित्र घेऊन लोक रस्त्यावर निदर्शने करत आहेत. तसेच राजकीय पक्षांचा विरोध करत आहेत.
नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी ५ डिसेंबर रोजी काठमांडू येथे करण्यात आलेले सामूहिक निषेध आंदोलन
(सौजन्य : ANI News)