अमेरिकेत अनेक उपचारांनी बरा न झालेला कर्करोग भारतात ‘पंचगव्य’ चिकित्सेने झाला बरा !
भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अमित वैद्य यांना ‘पंचगव्य’ चिकित्सेमुळे लाभले नवीन आयुष्य !
‘अमेरिकेत जन्मलेले आणि मूळ गुजरात येथील असलेले २७ वर्षीय अमित वैद्य हे अर्थशास्त्रामध्ये पीएच्.डी. मिळवून अमेरिकेत करमणूक उद्योगातील व्यवसाय विभागात काम करत होते. ते अत्यंत महत्त्वाकांक्षी होते; मात्र त्यांची जीवनशैली सक्रीय असूनही स्वस्थ नव्हती. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर काही मासांनंतर त्यांना जठरासंबंधी कर्करोग झाल्याचे निदान झाले, तेव्हा त्याची सर्व स्वप्ने भंगली. शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी न्यूयॉर्क येथे ‘केमो रेडिएशन’ चिकित्सा करून घेतली; मात्र दोन वर्षांनंतर त्यांना कर्करोगाने पुन्हा गाठले. त्यातच त्यांच्या आईचेही ट्युमरमुळे (मेंदूच्या आजाराने) निधन झाले. वर्ष २०११ मध्ये असे दिसून आले की, कर्करोग उपचारांना प्रतिसाद देत नाही आणि तो फुप्फुसातही पसरला आहे. डॉक्टरांनी अमित वैद्य यांना सांगितले, ‘‘तुमचे आयुष्यही अगदी काही काळासाठी आहे.’’ त्यामुळे वैद्य यांनी लवकरच भारतात येण्याचे ठरवले.
वैद्य यांनी भारतात येऊन त्यांच्या काकूंच्या सांगण्यानुसार गुजरातमधील आयुर्वेदीय रुग्णालयात चिकित्सा करण्याचे ठरवले. या चिकित्सापद्धतीत योग, ध्यान यांच्यासमवेत शिस्तबद्ध जीवन जगणे यांचा समावेश होता. शिवाय या रुग्णालयात त्यांना देशी गायीचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमुत्र यांचे मिश्रण (पंचगव्य) पिण्यास सिद्ध केले गेले. ते रिकाम्या पोटावर घेणे आवश्यक असते. अमित वैद्य यांनी या चिकित्सेवर विश्वास ठेवला आणि काळजीपूर्वक सर्व उपचार घेतले. वैद्य यांनी या रुग्णालयात ४० दिवस उपचार घेतल्यावर त्यांचा कर्करोग न्यून झाल्याचे अहवालात दिसून आले. त्यामुळे ही चिकित्सा चालू ठेवण्याचे ठरवून ते एका शेतकर्याच्या घरी राहिले. १८ मासांनंतर अमित वैद्य कर्करोगमुक्त झाले आणि त्यांनी नवीन आयुष्य जगण्याचे ठरवले. तेव्हापासून ते कर्करोगाच्या रुग्णांसमवेत वेळ घालवतात. त्यांनी ‘हिलिंग वैद्य’ नावाची स्वयंसेवी संस्था चालू केली आहे, तसेच त्यांनी ‘होली कॅन्सर – हाऊ ए काऊ सेव्हड माय लाइफ’ (आदित्य प्रकाशन) नावाचे पुस्तकही लिहिले आहे.’
(सौजन्य : द हिंदू)