कुर्टी, फोंडा येथील नुरानी मशिदीतून होणार्या ध्वनीप्रदूषणावर कारवाई करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी नुरानी मशिदीला बजावली नोटीस
ध्वनीप्रदूषण होत आहे, हे न्यायालयाने का सांगावे लागते ? पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना मशिदीतून दिवसातून ५ वेळा होणारे ध्वनीप्रदूषण ऐकू येत नाही का ?
फोंडा, ६ जानेवारी (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी कुर्टी, फोंडा येथील नुरानी मशिदीला ध्वनीप्रदूषणाशी संबंधित नोटीस बजावली आहे. वारखंडे, फोंडा येथील ‘सावित्री निवास’ येथे रहाणारे वरुण प्रियोळकर यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेची नोंद घेऊन ही नोटीस बजावण्यात आली आहे. (मशिदीतून होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणारे वारखंडे, फोंडा येथील वरुण प्रियोळकर यांचे अभिनंदन ! – संपादक) या प्रकरणी ११ जानेवारी या दिवशी अतिरिक्त न्यायदंडाधिकार्यांसमोर सुनावणी होणार आहे.
याचिकादाराच्या तक्रारीनुसार कुर्टी, फोंडा येथील क्रीडा प्रकल्पाजवळ असलेली नुरानी मशीद आणि अन्य मशिदी पहाटे, दुपारी, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक लावून नमाज पढतात. मोठ्या आवाजामुळे आसपासच्या लोकवस्तीमध्ये राहणार्या लोकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होतो, तसेच ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन होत आहे. वास्तविक जवळपास शाळा आणि रुग्णालये असल्यास ठराविक मर्यादेच्या पलीकडे ध्वनीप्रदूषणावर मर्यादा आहेत. तक्रारदार वरुण प्रियोळकर यांनी प्रारंभी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्याकडे यासंबंधी तक्रार प्रविष्ट केली होती. याविषयी वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीच कारवाई होत नसल्याने तक्रारदार वरुण प्रियोळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट करून या प्रकरणी न्याय देण्याची मागणी केली. (वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई न करणारे प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांच्यावर कारवाई व्हायला हवी ! धर्मांधांना घाबरणारे किंवा त्यांचे लांगूलचालन करणारे अधिकारी काय कामाचे ? – संपादक) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ही याचिका निकालात काढतांना या प्रकरणी ३ मासांत कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.