कर्नाटकातील काँग्रसचे नेते सिद्धरामय्या यांनी त्यांना विकासावरून प्रश्न विचारणार्या ग्रामपंचायत सदस्याला व्यासपिठावरून खाली ढकलले !
|
बागलकोट (कर्नाटक) – राज्यातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्याने सिद्धरामय्या यांनी गावातील समस्या न सोडवल्याचे सांगताच रागावलेल्या सिद्धरामय्या यांनी त्याला व्यासपिठावरून खाली ढकलले. राज्यातील बदामी येथे ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
बदामीच्या सरकारी कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या सन्मानाचा सोहळा चालू होता. त्या वेळी बदामी तालुक्यातील कित्तली गावातून निवडून आलेले संगण्णा बाबण्णवर म्हणाले, ‘‘गावात अनेक समस्या आहेत. कुणीही गावाकडे आले नाही. आमच्या गावातील आश्रय घरे (येथे पीडित महिला आणि अल्पवयीन मुले यांना आश्रय दिला जातो.) पडायला लागली आहेत. सिद्धरामय्या आमच्या गावात येऊन गेले; परंतु आमच्या गावाची कोणतीच प्रगती झाली नाही.’’ संगण्णा बाबण्णवर यांचे बोलणे ऐकून सिद्धरामय्या यांना राग आला. ते आसनावरून उठले आणि त्यांनी बाबण्णवर यांचे बोलणे थांबवून त्यांना व्यासपिठावरून खाली ढकलले.