मनसेच्या विरोधातील खटला मागे घेण्यासाठी ‘अॅमेझॉन’कडून न्यायालयात अर्ज
आंतरराष्ट्रीय आस्थापनांना दांडुक्याचीच भाषा कळते असे समजायचे का ?
मुंबई – ‘अॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याविषयी मनसेकडून घेण्यात आलेल्या आक्रमक भूमिकेच्या विरोधात ‘अॅमेझॉन’कडून दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य पदाधिकारी यांच्या विरोधात खटला प्रविष्ट करण्यात आला होता. हा खटला मागे घ्यावा, यासाठी आता ‘अॅमेझॉन’कडून न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.
या प्रकरणी न्यायालयाकडून राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसेच्या कार्याकर्त्यांनी मुंबई आणि पुणे येथील ‘अॅमेझॉन’च्या काही कार्यालयांची तोडफोड केली. त्यामुळे आता ‘अॅमेझॉन’ने नरमाईची भूमिका घेतली आहे, तसेच ‘अॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याविषयीही सिद्धता दर्शवली आहे.