सर्व आदेश धाब्यावर बसवून नायलॉन मांजाची खुलेआम विक्री
नायलॉनच्या मांजामुळे गळा कापल्याने प्रतिवर्षी अनेक लोक गंभीर घायाळ होतात,तर शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो, हे वास्तव लक्षात घ्यायला हवे
पुणे – राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एन्जीटी) नायलॉन मांजावर ४ वर्षांपूर्वीच बंदी घातली आहे. औरंगाबाद खंडपिठाने मात्र गेल्याच आठवड्यात दिलेल्या आदेशांमध्ये पुन्हा एकदा नायलॉन मांजांवरील बंदी कायम केली आहे. संक्रात जवळ आल्याने सर्व आदेश धाब्यावर बसवून उत्पादकांकडून नायलॉन मांजाचा पुरवठा आणि विक्रीही चालू झाली आहे. ‘नागरिकांनी सिंथेटक आणि नायलॉन मांजाची खरेदी करू नये’, असे आवाहन पक्षीप्रेमींनी केले आहे.
मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण घारी आणि घुबड यांचे प्रमाण असते. उंचावर अडकलेल्या पक्ष्यांना काढणे आमच्यासाठी आव्हान ठरते, असे पक्षीमित्र अनिल अवचिते यांनी सांगितले.