इंदूर (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री हनुमानाचे विडंबन थांबले
प्रबोधनानंतर आस्थापनाकडून मीठाच्या पाकिटावर श्री हनुमानाचे चित्र छापणे बंद
इंदूर (तेलंगाणा) – येथे एस्.आर्.जे. नावाचे एक खासगी आस्थापन आहे. हे आस्थापन मीठाच्या पाकिटावर श्री हनुमानाचे चित्र छापत होते. याविषयीची माहिती हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यावर श्री. नेला तुकाराम, श्री. यादगिरी आणि अधिवक्ता शरत चंद्र यांनी आस्थापानच्या मालकांचे ‘यातून देवतांचा अवमान कसा होत आहे ?’, याविषयी प्रबोधन केल्यावर त्यांनी श्री हनुमानाचे चित्र छापणे बंद करण्याचे मान्य केले.