मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री असतांना ६ मासांत सरकारी बंगल्याच्या सजावटीसाठी खर्च केले ८२ लाख रुपये !
जनतेच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी करणार्या राजकारण्यांकडून ही रक्कम व्याजासहित वसूल केली पाहिजे !
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अवघ्या ६ मासांमध्ये सरकारी बंगल्याच्या सजावाटीसाठी, तसेच फर्निचर आणि भांडी विकत घेण्यासाठी ८२ लाख रुपये खर्च केल्याची माहिती ‘माहिती अधिकारा’तून मिळाली आहे. श्रीनगरमधील इनाम उन नबी सौदागर यांनी ही माहिती मागितली होती.
#MehboobaMufti spent Rs 82 lakh in 6 months as #JammuAndKashmir CM on the refurbishment of her official residence, reveals #RTI query.https://t.co/AnfVJB0l6P
— Zee News English (@ZeeNewsEnglish) January 6, 2021