वास्को येथे साई मंदिराची कमान पाडल्याच्या प्रकरणी संशयित जोसेफ फर्नांडिस पोलिसांच्या कह्यात
‘गोवा शिपयार्ड’ आस्थापनाजवळील अनेक धार्मिक फलकांची हानी केल्याचे उघड
भक्तांनी दबाव आणल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली, असेच म्हणावे लागेल !
वास्को, ५ जानेवारी (वार्ता.) – येथील गोवा शिपयार्ड आस्थापनाच्या समोरील श्री साई मंदिरात उत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेली कमान २ जानेवारी या दिवशी रात्री ११ वाजता एका अल्पसंख्य व्यक्तीने तोडल्याची तक्रार मंदिराचे व्यवस्थापक मंडळ आणि स्थानिक साईभक्त यांनी वास्को पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी वास्को पोलिसांनी वाडे, वास्को येथील रहिवासी संशयित जोसेफ फर्नांडिस याला ४ जानेवारी या दिवशी रात्री कह्यात घेतले आहे. संशयित जोसेफ फर्नांडिस याने ‘गोवा शिपयार्ड’ आस्थापनाजवळील अनेक धार्मिक फलकांची हानी केल्याचा पोलिसांना संशय आहे.
श्री साई मंदिरात उत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेली कमान काढून टाकण्यात आल्याने भक्तांच्या दबावानंतर पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून घेतली होती. वास्को परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तत्परतेने कारवाई केल्याने मुख्यमंत्र्यांचे आभार ! – शैलेंद्र वेलिंगकर
साईभक्त आणि ‘श्री परशुराम गोमंतक सेना’ यांच्या मागणीनंतर वास्को येथे साई मंदिराची कमान पाडल्याच्या प्रकरणी संशयिताला तत्परतेने कह्यात घेतल्याने गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आम्ही आभारी आहोत. यामुळे न्याय मिळण्याची आशा सर्व साईभक्तांमध्ये निर्माण झाली आहे.