पणजी येथे आज ज्येष्ठ पत्रकार रामनाथ देसाई यांचा सत्कार
पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) – गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि गोवा मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने ६ जानेवारी या दिवशी सायंकाळी ४ वाजता मंडळाच्या सभागृहात ४ ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये डिचोली येथील ज्येष्ठ पत्रकार रामनाथ देसाई, तसेच प्रकाश कुर्डीकर, जनार्दन नागवेकर आणि अरविंद धुरे यांचा समावेश आहे. ‘मराठी पत्रकार दिना’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हा सत्कार सोहळा होणार आहे.