औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता !
सर्वत्रचे साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुवर्णसंधी !
‘आगामी भीषण संकटकाळामध्ये आरोग्यरक्षणासाठी अॅलोपॅथीतील औषधांचा नव्हे, तर बहुगुणी आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचाच आधार असणार आहे. सध्या यांतील अनेक औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत. त्या वनस्पतींचे संवर्धन, म्हणजेच लागवड करणे अपरिहार्य आहे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आयुर्वेद शाखेच्या वतीने ठिकठिकाणी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता आहे. या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी खालील सारणीनुसार त्यांची माहिती पाठवावी.
संगणकीय पत्ता : mav.lagvad@gmail.com
टपालाचा पत्ता : श्री. विष्णु जाधव, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
यात काही शंका असल्यास श्री. विष्णु जाधव यांच्याशी ८२०८५१४७९१ या क्रमांकावर संपर्क करावा.’