सत्तेच्या बाजारात विकली गेलेली मृत पत्रकारिता !
६ जानेवारी या दिवशी असलेल्या ‘पत्रकारदिना’च्या निमित्ताने…
१. सत्तेच्या बाजारात आपली लेखणी विकणार्या स्वार्थी माणसांकडून राष्ट्राविषयी चिंतन होणे अशक्य !
‘ज्या राष्ट्रातील बुद्धीवादी स्वार्थ आणि स्वतःच्या सोयी-सुविधा यांचाच विचार करत असतील, तर त्यांच्याकडून राष्ट्राविषयी चिंतन कधीही होऊ शकत नाही. ज्याने आपली लेखणी सत्तेच्या बाजारात विकली आहे, अशी व्यक्ती चिंतन करणारा विचारवंत होऊच शकत नाही.
२. आजचा लेखक, साहित्यिक आणि पत्रकार स्वार्थी अन् भित्रा झाल्याने विकला गेला असून तो समाजाच्या ध्येयांना समर्पित आहे कि नाही, हीच पत्रकारितेची परीक्षा असणे
सत्य हेच आहे की, आजचा लेखक, साहित्यिक आणि पत्रकार स्वार्थी अन् भित्रा झाल्याने विकला गेला आहे. या देशातील सामान्य माणूस हा आजच्या तथाकथित लेखक, साहित्यिक आणि पत्रकार यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिलेला नाही. लेखक आणि पत्रकार यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, ‘ते जिवंत असल्याची जाणीव समाजाला नसेल, तर ते सर्व मृत असल्यासारखे आहेत.’ वास्तविक पत्रकारितेची हीच परीक्षा असते की, तो स्वतःच्या सुख आणि सुविधा मिळवण्यात मग्न आहे कि समाजाच्या ध्येयांना समर्पित आहे.’
(मासिक ‘ठेंगेपर सब मार दिया’, सप्टेंबर २०१०)