गोव्यात अल्प कालावधीत सर्वांनाच लस देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) – देशात कोरोनाच्या लसीकरणाला प्रारंभ झाल्यानंतर गोव्यात अल्प कालावधीत १०० टक्के लोकांना लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. राज्याचे क्षेत्रफळ लहान असल्याने, याचा लाभ लसीकरणाच्या वेळी होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. सांखळी येथील रवींद्र भवन येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘कोरोना लसीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्याचे आरोग्य खाते सज्ज आहे. सर्वप्रथम कोरोना योद्धे आणि त्यानंतर ज्येष्ठ नागरिक यांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीरित्या पार पडली आहे.’’