रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !
श्री. ज्ञानेश्वर बेरड, अहमदनगर, आश्रम पाहून जीवनाला दिशा मिळाली ! : ‘आश्रमात आल्यावर मला पुष्कळ प्रसन्न वाटले. आश्रमातील वातावरण आणि बाहेरील वातावरण यांमध्ये पुष्कळ भेद आहे. माझ्या मनात आश्रमाविषयी जे चित्र निर्माण झाले होते, त्यापेक्षा येथे पुष्कळ वेगळे आहे. आश्रम पाहून माझ्या जीवनाला दिशा मिळाली आणि माझे मन प्रसन्न झाले. मी पुष्कळ धन्य झालो.’ (७.३.२०२०)
श्री. मल्लेशप्पा एन्. बाडगी, कर्नाटक
१. ‘रामनाथी आश्रम पुष्कळ चैतन्यमय आहे. त्यामुळे मी पुष्कळ कार्यरत असूनही मला थकवा आला नाही.
२. आश्रमात असतांना मला ‘देव डोळ्यांसमोर आहे’, अशी अनुभूती येत होती. त्यामुळे मला आनंद झाला.’ (२६.१२.२०१९)