आज पत्रकार दिनानिमित्त वाशी येथे परिसंवादाचे आयोजन
नवी मुंबई – दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग यांच्या सहकार्याने ६ जानेवारीला पत्रकारदिनी परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सचिव तथा महासंचालक, माहिती आणि जनसंपर्क डॉ. दिलीप पांढरपट्टे, दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पत्रकार आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे, नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष, मनोज जालनावाला, नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्सचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.