पुण्यातील सर्व महाविद्यालये ११ जानेवारीपासून चालू करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा निर्णय
पुणे – कोरोनाचा संसर्ग अल्प होत असल्याने ११ जानेवारीपासून सर्व अभ्यासक्रमांचे थेट वर्ग आणि प्रॅक्टिकल चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ग चालू होतांना विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) आणि राज्य शासन यांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे प्राचार्य व्ही.बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जाहीर केले आहे.
ऑगस्ट मासापासून काही अभ्यासक्रमांचे वर्ग, अन्य व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने चालू होते; पण ‘प्रॅक्टिकल करण्यात अडचणी असल्याने आता ११ जानेवारीपासून सर्व अभ्यासक्रमांचे वर्ग प्रॅक्टिकलसह चालू होतील’, असे जाहीर केले आहे.