कारखान्यातील यंत्रामध्ये अडकून कामगाराचा मृत्यू
सातारा, ५ जानेवारी (वार्ता.) – येथील औद्यागिक वसाहतीमधील एका कारखान्यात काम करत असतांना यंत्रामध्ये अडकून एक कामगार बेशुद्ध पडला. अन्य कामगारांनी यंत्र बंद करून कामगाराला बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले. उमेश पवार असे मृत कामगाराचे नाव आहे.