कोरोनावरील लस देण्यासाठी मुंबईत जम्बो लसीकरण केंद्रे उभारणार ! – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका
मुंबई – मुंबईमध्ये ज्या ठिकाणी जम्बो कोरोना सेंटर उभारण्यात आले होते, त्या ठिकाणी आता जम्बो लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. अशा प्रकारची १०० केंद्रे उभारण्याचे नियोजन आहे. यांमध्ये दिवसाला ५० सहस्रांपर्यंत नागरिकांना लस देण्याची क्षमता असेल. यामध्ये प्रथम आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.