आम्ही केरळच्या मुख्यमंत्र्यांचे गुलाम नाही ! – केरळमधील आर्थोडॉक्स चर्चची चेतावणी
चर्चच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप न करण्याची समज
भारतातील एकातरी हिंदु मंदिराचे विश्वस्त अशा प्रकारची चेतावणी शासनकर्त्यांना देऊ शकतात का ?
थिरूवनंतपूरम् (केरळ) – आम्ही केरळच्या मुख्यमंत्र्यांचे गुलाम नाही. मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांनी चर्चशी व्यवहार करतांना शालीनता दाखवली पाहिजे, अशा शब्दांत राज्यातील ऑर्थोडॉक्स चर्चने चेतावणी दिली आहे. मुख्यमंत्री विजयन् यांनी एका पाद्रयाला ऑर्थोडॉक्स चर्च आणि जॅकबाइट चर्च यांच्यातील वादाविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रसारमाध्यम प्रमुख डॉ. गीवर्गिस यांनी ही चेतावणी दिली, तसेच त्यांनी विजयन् यांच्यावर खोटे बोलण्यावरूनही टीका केली.
‘Won’t allow communist party’s fascist regime in Kerala’: Orthodox church asks CM Pinarayi Vijayan to keep his opinions to himselfhttps://t.co/0vAPl9utY7
— OpIndia.com (@OpIndia_com) January 4, 2021
डॉ. गीवर्गिस पुढे म्हणाले की, केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या फॅसिस्ट शासनाला चर्चच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांचा राजकीय आदेश त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना असायला हवा, ऑर्थोडॉक्स चर्चला असू नये. विजयन् यांनी मुख्यमंत्रीपदाचा सन्माना राखावा.