हिंदु महासभेचे राष्ट्रीय महामंत्री देवेंद्र पांडे यांच्यावर प्राणघातक आक्रमण

आरोपींना त्वरित अटक करण्याची अखिल भारतीय हिंदु महासभेची मागणी

भाजप सत्तेत असणार्‍या राज्यात हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण होणे अपेक्षित नाही ! तेथील हिंदुत्वनिष्ठांना आश्‍वस्त करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

हिंदु महासभेचे राष्ट्रीय महामंत्री देवेंद्र पांडे

सतना (मध्यप्रदेश) – अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय महामंत्री देवेंद्र पांडे यांच्यावर १४ डिसेंबरच्या रात्री प्राणघातक आक्रमण करण्यात आले. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी सतना पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ‘आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी’, या मागणीसाठी हिंदु महासभेच्या वतीने रतलाम पोलीस अधीक्षकांना नुकतेच निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रदेश संघटनमंत्री मंगलसिंह डाबी, प्रदेश माध्यम प्रभारी भरत शर्मा, प्रदेश माध्यम प्रभारी विमला वर्मा डाबी, प्रदेश उपसंघटनमंत्री नीरज कश्यप, जिल्हाध्यक्ष आचार्य पंडित राहुल शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष तरुण पडियार आदी उपस्थित होते.

हिंदु महासभेचे राष्ट्रीय महामंत्री देवेंद्र पांडे

हिंदु महासभेचे प्रदेश संघटनमंत्री श्री. डाबी पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, ‘‘पांडे हे हिंदूंना धर्माप्रती जागृत करत होते, तसेच ते सातत्याने हिंदु धर्मावरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवायचे. त्यामुळे धर्मांधांनी त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले आहे. यापूर्वी पांडे यांना त्यांच्यावरील संभाव्य आक्रमणाविषयी गुप्तचर यंत्रणांकडून सूचना देण्यात आली होती; परंतु राज्य सरकारकडून त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची सुरक्षा देण्यात आलेली नाही. त्यामुळे पांडे यांना राज्य सरकारने त्वरित पोलीस संरक्षण द्यावे. मध्यप्रदेशमध्ये या वर्षात प्राणघातक आक्रमण होणारे ते ५ वे हिंदुत्वनिष्ठ  नेते आहेत. जर ४८ घंट्यांच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही, तर महासभेकडून आंदोलन करण्यात येईल.’’