चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत पूर्ण केले तिबेटला जोडणार्या रेल्वेमार्गाचे काम !
चीन भारताला घेरण्यासाठी चोहोबाजूंनी प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घेऊन चीनला घेरण्याचा भारतानेही प्रयत्न केला पाहिजे !
नवी देहली – अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ असणार्या तिबेटमधील ल्हासा आणि नायींगशी या शहरांना जोडण्यासाठी चीनने रेल्वेमार्गासाठी रुळ बनवण्याचे काम पूर्ण केल्याची माहिती चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
China completed the track-laying work for a railway line linking the cities of Lhasa and Nyingchi in Tibet, close to the Indian border in Arunachal Pradesh.https://t.co/N31xAORjJA
— The New Indian Express (@NewIndianXpress) December 31, 2020
हा मार्ग छिंघाई-तिबेट पठाराच्या आग्नेय दिशेकडून जाणार आहे. हा प्रदेश भूमीखालील भौगोलिक हालचालींसाठी जगभरात ओळखला जात असल्याने विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून या रेल्वेमार्गाचे काम करण्यात आले आहे. या रेल्वेमार्गामुळे चेंगदु आणि ल्हासा या दोन मुख्य शहरांमधील अंतर तब्बल ३५ घंट्यांंनी अल्प होणार आहे. ‘हा रेल्वेमार्ग देशाच्या सुरक्षेसाठी आणि भारत-चीन सीमेवरील शांततेसाठी महत्त्वाचा ठरील’ असे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग म्हणाले होते.