कणकवली बाजारपेठेतील दोन दुकाने जळून खाक
कणकवली – येथील बाजारपेठेतील झेंडाचौक येथे ४ जानेवारीला पहाटे लागलेल्या भीषण आगीत ‘जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस’ अन् ‘रामचंद्र उचले किराणा आणि आयुर्वेदिक दुकान’ ही दोन दुकाने जळून खाक झाली. कोल्ड्रिंक्स हाऊस शेजारील अंधारी ब्रदर्स यांचे दुकान आणि रहात्या घरालाही आगीची झळ पोचली. प्रारंभी कणकवली नगरपंचायतीच्या अग्नीशामक बंबाद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न चालू होता; मात्र आगीची तीव्रता बघून कुडाळ, सावंतवाडी येथूनही बंब मागवण्यात आले. आगीचे नेमके कारण समजले नसले, तरी ही आग शॉट सर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
दुकानांचे मालक आबा उचले, राजेंद्र बाजाजी, नाथा अंधारी यांची लाखो रुपयांची हानी झाली.