काँग्रेसने दिलेल्या यातनांतून मी अद्यापही बाहेर आलेले नाही ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह
मुंबई – माझी प्रकृती बरी नसते; मात्र ज्या वेळेस मला न्यायालय बोलावते, त्या वेळेस मी उपस्थित रहाते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात काँग्रेसने मला जो त्रास दिला, त्याविषयी मला न्याय हवा आहे. काँग्रेसने दिलेल्या यातनांतून मी अद्यापही बाहेर आलेले नाही, असे वक्तव्य खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणीसाठी ४ जानेवारी या दिवशी त्या विशेष न्यायालयात उपस्थित झाल्या होत्या. त्या वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
वर्ष २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून याविषयी सुनावणी चालू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारी या दिवशी होणार आहे.