इयत्ता १२ ची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर इयत्ता १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री
मुंबई – यावर्षी इयत्ता १२ वीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, तर १० वीची परीक्षा १ मे नंतर होऊ शकते, अशी माहिती शालेय शिक्षण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आहे. त्यामुळे यावर्षी परीक्षा विलंबानेे घेण्यात येणार आहेत. ‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांची परीक्षाही ऑक्टोबर मासात न होता नंतर घेण्यात येईल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.