सांगली-कोल्हापुरात दिवसभर ढगाळ वातावरण : सायंकाळी कोल्हापुरात पाऊस
सांगली, ४ जानेवारी (वार्ता.) – ४ जानेवारीला सांगली-कोल्हापुरात ढगाळ वातावरण राहिले. सायंकाळी कोल्हापुरात जोरात पाऊस आला. ५ जानेवारीलाही हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे भाजीपाला, द्राक्ष बागायतदार, गुर्हाळघरे, वीटभट्टया यांची हानी झाली.