सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुन्हा पुढे ढकलली : भाजपच्या १० आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिका प्रविष्ट केल्याचे प्रकरण
पणजी – गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे तत्कालीन अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोव्यातील काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केलेल्या १० बंडखोर आमदारांच्या विरोधात गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर अपात्रता याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवर ४ जानेवारी या दिवशी होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली आहे. याविषयीची सुनावणी आता फेब्रुवारी मासात होणार आहे.
भाजपच्या बंडखोरीला सर्वोच्च न्यायालयाचा पाठिंबा ? – काँग्रेस
गोव्यात एका वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालय निर्णय घेऊन ही याचिका निकालात काढेपर्यंत त्याला काहीच अर्थ रहाणार नाही. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित केलेला आहे’, असे वाटते. भाजपने केलेल्या बंडखोरीला सर्वोच्च न्यायालयाचा पाठिंबा आहे कि काय, असा प्रश्न निर्माण होतो’, असे मत काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी ट्विवट करून उपस्थित केला.
By the time Hon’ble Judges decide to hear & dispose of the disqualification petition, it will be infructous as elections in Goa will be in year.
The CJI seems to have his priorities set.
Looks like defections by BJP has the backing of the #SupremeCourt. https://t.co/f3OS25nWMH— Dinesh Gundu Rao/ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್ (@dineshgrao) January 4, 2021